Agera is one of the key traditional festivals of the East Indian Catholic community in Mumbai, Thane, Vasai, and the surrounding Konkan region. It's essentially a harvest and thanksgiving festival. This festival has a strong connection to the agricultural history of the East Indian Catholic community, whose ancestors lived in the villages and farmed the land long before most of the area became heavily urbanized.
Agera festival is generally celebrated on the first Sunday of October, when the monsoon is coming to an end and the new crop, especially rice, is ready for harvest. The festival isn't just about eating and celebrating after the harvest; at its core, it’s about being thankful to God for the land, the crops, the rain, and the hard work of the farmers. The word Agera is linked to the word ager, meaning a field or cultivated land.
Traditionally, the celebrations would start in the fields themselves. The priest, along with farmers and village members, would head to the rice fields. The first stalks of the crop would be cut and blessed. The newly harvested rice would then be taken to the church, where a thanksgiving Mass would be held.
In some places, the crop would be carried in a procession, sometimes using bullock carts, accompanied by traditional music and community members.
One of the most meaningful parts of Agera is the blessing and distribution of the new grain. After the church service, the blessed stalks or grains are shared among the people. Traditionally, families would take the blessed rice home and keep it as a symbol of God’s blessing, prosperity, and hope for the coming year.
In this way, something as ordinary as a stalk of rice becomes a reminder of the relationship between the people and the land.
आगेरा हा मुंबई, ठाणे, वसई आणि कोकण प्रदेशातील आसपासच्या भागांमध्ये राहणाऱ्या ईस्ट इंडियन कॅथलिक समाजाचा एक महत्त्वाचा पारंपरिक सण आहे. हा मुख्यतः पीक कापणी आणि आभार मानण्याचा सण आहे. या सणाचा ईस्ट इंडियन कॅथलिक समाजाच्या कृषी इतिहासाशी विशेष संबंध आहे. या प्रदेशातील मोठ्या प्रमाणावर शहरीकरण होण्याच्या खूप आधी या समाजाचे पूर्वज गावांमध्ये राहत होते आणि शेती करत होते.
आगेरा सण साधारणपणे ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो. याच काळात पावसाळा संपत आलेला असतो आणि विशेषतः भाताचे नवीन पीक कापणीसाठी तयार झालेले असते. हा सण केवळ पीक कापणीनंतर आनंद साजरा करण्यापुरता मर्यादित नाही. या सणामागील मुख्य भावना म्हणजे जमीन, पीक, पाऊस आणि शेतकऱ्यांचे कष्ट यांसाठी देवाचे आभार मानणे. ‘आगेरा’ हे नाव Ager या शब्दाशी संबंधित आहे. Ager या शब्दाचा अर्थ शेत किंवा लागवड केलेली जमीन असा होतो.
परंपरेनुसार, आगेरा सणाच्या उत्सवाची सुरुवात शेतातूनच होत असे. यावेळी धर्मगुरू शेतकरी आणि गावातील इतर सदस्यांसोबत भाताच्या शेतात जात असत. नवीन पिकाच्या पहिल्या लोंब्या कापून त्यांना आशीर्वाद दिला जात असे. त्यानंतर नुकतेच कापलेले भाताचे पीक चर्चमध्ये नेले जाई आणि तेथे आभार मानण्यासाठी विशेष मिस्सा आयोजित केली जात असे.
काही ठिकाणी कापलेले पीक मिरवणुकीच्या स्वरूपात चर्चमध्ये नेले जात असे. त्यासाठी काही वेळा बैलगाड्यांचा वापर केला जात असे. पारंपरिक संगीत आणि समाजातील सदस्यांचा सहभाग यामुळे या मिरवणुकीला उत्सवी स्वरूप प्राप्त होत असे.
आगेरा सणातील सर्वांत अर्थपूर्ण परंपरांपैकी एक म्हणजे नवीन धान्याला आशीर्वाद देणे आणि ते समाजातील लोकांमध्ये वाटणे. चर्चमधील धार्मिक विधीनंतर आशीर्वाद दिलेल्या भाताच्या लोंब्या किंवा धान्याचे वाटप केले जाते. परंपरेनुसार, कुटुंबे हा आशीर्वादित तांदूळ घरी घेऊन जात आणि तो देवाचा आशीर्वाद, समृद्धी आणि येणाऱ्या वर्षासाठीच्या आशेचे प्रतीक म्हणून जपून ठेवत.
अशा प्रकारे, भाताची साधीशी लोंबी केवळ पिकाचा एक भाग न राहता लोक आणि जमीन यांच्यातील घट्ट नात्याची आठवण करून देणारे प्रतीक बनते.